सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

चारोळी ४

ओळखलय मी या जगाला.
रित आहे याची, संपली गरज हो बाजुला.
एवढच काय जेव्हा सोडतो श्वास ह्रदयाला,

कोणी "आपला"च येतो पेटवायला.

रविवार, २९ ऑगस्ट, २०१०

चारोळी ३

जेव्हा जेव्हा शोधली मी यशाची गुरुकिल्ली.
कोणीतरी आलचं कुलूप बदलायला.
आता मात्र मी मार्ग बदललाय,
शिकलोय दरवाजेच उध्वस्त करायला.

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

चारोळी २

त्या मंतरलेल्या कातरवेळेला,
एकटाच होतो तुझ्या आठवणीत बुडलेला.
शेवटी दया आली त्या वेड्या पावसाला,
अन् सोबत केली त्याने माझ्या डोळ्यातील आसवांना...!!!

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

चारोळी १

वाटल मलाही, मागावं काहीतरी.
पाहुन एक तारा गळताना.
बंडखोर मन म्हटलच लगेच.
अरे काय देईल तो तुला,
जमत नाही ज्याला स्वतःलाच सावरायला.

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

बालपण

होता एक मामाचा गाव, तो भातुकलीचा डाव.
पावसाची चिंब सर अन् कागदाची नाव.
भावंडाशी भाडणं तर आईसाठी रडणं होतं.
कुठे आलो या तारुण्याच्या दलदलीत, खरच ते बालपण किती भाबडं होतं.

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

एकलव्य



नाही व्हायच कर्ण मला,नियतीच्या चाकात अडकणारा.
 नाही व्हायच अर्जुन मला, साम दाम दंड भेदाने युध्द जिंकणारा.
आवडेल मला "एकलव्य" व्हायला सर्वस्व गमावूनही जगाला जिंकणारा